राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरातील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव २०२६ उत्साहात स...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी परिसरातील ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंडळाचा हा ११ वा वर्षाचा उत्सव असून भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ओंकारेश्वर मंदिर, शिंदे वस्ती, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी येथे हा उत्सव पार पडणार आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. रेखाताई महाराज काकडे ( सिन्नर) यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे.
हरिकीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच सायंकाळी ६ ते ७ या वेळेत भागवताचार्य ह.भ.प. सोमनाथ महाराज माने यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओंकारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत