राहुरी फॅक्टरीत सोमेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्री उत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत सोमेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्री उत्सव

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील अंबिकानगर परिसरातील श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे महाशिवरात्रीनिमित्त १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वि...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

येथील अंबिकानगर परिसरातील श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे महाशिवरात्रीनिमित्त १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांपासून सातत्याने हा उत्सव साजरा केला जात असून यंदा उत्सवाचे २१ वे वर्ष आहे.

उत्सव काळात शिवलीलामृत पारायण, हरिपाठ, महाआरती, किर्तन तसेच महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता साई महाराज जाधव यांचे किर्तन होणार आहे. रविवार, १५ फेब्रुवारी रोजी विलास महाराज हारदे यांचे किर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संतसेवक बाबा महाराज मोरे यांचे किर्तन होणार असून महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोमेश्वर वसाहत, अंबिकानगर येथील ग्रामस्थ, महिला भजनी मंडळ व श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत