नेवासे(वेबटीम) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसला गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ओतूर येथील डुंबरवाडीजवळ चा...
नेवासे(वेबटीम)
येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसला गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ओतूर येथील डुंबरवाडीजवळ चालत्या बसचे टायर फुटून झालेल्या अपघातात बस पल्टी होऊन यामध्ये तीन शिक्षकांसह ११ शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पिंप्री शहाली (ता. नेवासे) गावचे सरपंच सतिष चंदन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेवून मदतीचा हात दिला. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, पिंप्री शहाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी ते सातवी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुरुवारी पहाटे शिवनेरी, लेण्याद्री,ओझरला जाण्यासाठी निघालेली असताना या बसला ओझरजवळ अपघात झाला.
या अपघातात १४ जण जखमी झाले असून जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही समावेश आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाला डुलकी लागल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा अपघातस्थळी सुरु होती.
नेवासे तालुक्यात पिंप्री शहाली हे गाव असून नेवासे बस आगाराऐवजी शेवगांव आगाराची बस (क्र.एम.एच 14 एल. एक्स.6747) ही या शालेय विद्यार्थ्यांना घेवून गेलेली असून नेवासे तालुक्याच्या सहलीत शेवगाव आगाराची ही बस कशी आली अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. या झालेल्या अपघातात एका विद्यार्थांच्या बरगडीला तसेच एका विद्यार्थ्यांच्या हाताचा कोपरा फॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसचे टायर फुटून बसने पलटी घेतल्यामुळे ही बस रस्त्याच्या खाली जाऊन पल्टी झाली. अपघातग्रस्तांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सरपंच सतिष चंदन यांनी दिली.
जिल्हा परिषद पिंप्रि शहाली शाळेची सहलीसाठी इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत विद्यार्थी गेले होते. बसचा टायर फुटल्याने अपघात झाला असल्याचे सकाळी कळाले. एकुण १४जण जखमी असून त्यामध्ये ३शिक्षकांचा समावेश आहे. गंभीर इजा झालेले उपचार घेत असून उर्वरित विद्यार्थी व शिक्षक दि.१२ रोजी दुपारी परतणार आहे
संजय कळमकर- शिक्षण अधिकारी,पंचायत समिती नेवासे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत