देवळाली प्रवरा महावितरणचा रामभरोसे कारभार, २४ तास उलटूनही राहुरी फॅक्टरीतील काही भागात वीजपुरवठा ठप्प - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा महावितरणचा रामभरोसे कारभार, २४ तास उलटूनही राहुरी फॅक्टरीतील काही भागात वीजपुरवठा ठप्प

राहुरी फॅक्टरी  देवळाली प्रवरा परिसरात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत असून, राहुरी फॅक्टरी परिसरातील काही भागात तब्बल २४ त...

राहुरी फॅक्टरी



 देवळाली प्रवरा परिसरात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत असून, राहुरी फॅक्टरी परिसरातील काही भागात तब्बल २४ तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे प्रसादनगर, गुरुकुल वसाहत आणि समर्थनगर येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


 काल रात्री प्रसादनगर परिसरात एका चालत्या कंटेनरमुळे विजेच्या तारा तुटल्या. यावेळी विजेचा पोल थेट एका घरावर कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.


घटनेनंतर महावितरणकडून आज रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २४ तास उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता हा पुरवठा सोमवारी संध्याकाळपर्यंतच सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रहिवाशांना पाणी, दैनंदिन कामे आणि उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना अंधारामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत