'भिवा फरारी स्वरूप : आणि समीक्षा' हा ग्रंथ आदिवासी साहित्य विश्वात महत्वाचा टप्पा ठरेल : प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'भिवा फरारी स्वरूप : आणि समीक्षा' हा ग्रंथ आदिवासी साहित्य विश्वात महत्वाचा टप्पा ठरेल : प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे

राहुरी(वेबटीम) निनाद फाऊंडेशन, राहुरी व पीपल्स पब्लिकेशन, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या डॉ. मनो...

राहुरी(वेबटीम)



निनाद फाऊंडेशन, राहुरी व पीपल्स पब्लिकेशन, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या डॉ. मनोज बापुसाहेब तेलोरे लिखित 'भिवा फरारी : स्वरूप आणि समीक्षा' या ग्रंथाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात १९ एप्रिल रोजी पार पडले. मा. हर्षदादा तनपुरे यांचे शुभहस्ते श्री गाडगे महाराज आश्रम शाळेच्या मातोश्री सभागृहात साहित्य प्रेमींच्या उपस्थित हा सोहळा  साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवयित्री प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व समीक्षक प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे उपस्थित होते. याप्रसंगी ग्रंथभाष्यकार म्हणून प्रकाशक प्रा. हरेंद्र सोष्टे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार उदार उपस्थित होते. तसेच, लेखकाचे वडील- बापुसाहेब तेलोरे, आई- सौ. कमल तेलोरे, अरुण ठोकळे, गणेश देशमुख, गीताराम गायकवाड,  इंदुमती  सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हर्ष तनपुरे व मान्यवरांचे हस्ते ग्रंथाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.

ग्रंथाचे लेखक मनोज तेलोरे यांनी आपल्या मनोगतात ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा व लेखनप्रक्रियेत मदत झालेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाचकांना नवा दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आल्याचे सांगितले, तर हर्ष तनपुरे यांनी लेखकाचे अभिनंदन करत आदर्श समाज निर्मितीत वाचन व लेखनाची आवश्यकता आधोरेखित केली.

डॉ. तुकाराम रोंगटे यांनी आपल्या भाषणात ग्रंथाचा आशय, मांडणी आणि समीक्षात्मक दृष्टीकोनाचे कौतुक करत हा ग्रंथ साहित्य विश्वात महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. संशोधक, अभ्यासक आणि नवोदित लेखक यांचेसाठी ग्रंथ प्रेरणादायी ठरेल असेही नमूद केले. ग्रंथभाष्यकारांनी ग्रंथाची आवश्यकता, उपयुक्तता, मर्यादा व बलस्थाने याविषयी चर्चा केली. तर, प्राचार्य गुंफा कोकाटे यांनी लेखकाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तसेच विविधांगी दृष्टीने कार्यक्रमाची यशस्विता स्पष्ट केली. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक थेटे सर व कर्मचारी वृंद, अमोल तेलोरे, डॉ. राहुल तौर, डॉ. संदीप इरोळे, डॉ. रंगनाथ खिलारी, डॉ. संदीप मगर, डॉ. अनिरुद्ध जाधव,प्रा. पूर्णांक चौधरी, प्रा. दत्तात्रय आसवले, अमोल चोपडे, सुदाम कोहकडे, समीर पवार, वसंत शेळके, महेश बिडवे आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रा. सतीश तेलोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप इरोळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत