देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘विराट हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम बुधवारी, दि....
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘विराट हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम बुधवारी, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बाजारतळ येथे होणार आहे.
हिंदू समाजात एकता, बंधुता व समरसता निर्माण व्हावी, तसेच हिंदू संस्कृतीला नवी ऊर्जा व दिशा मिळावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “हिंदू सारे एकदिलाने, बिंदू बिंदू जोडूया, बंधुत्वाचा समरसतेचा रामसेतू हा बांधूया” हा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.
या संमेलनात प्रमुख उपस्थिती म्हणून महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज, महंत ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे उपस्थित राहणार आहेत. तसेच धर्मजागरण क्षेत्रातील प्रमुख वक्ते मिलिंद वायकर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाअंतर्गत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ वाजता आण्णासाहेब कदम पुतळा (डेपो) येथून शोभायात्रा निघून बाजारतळ येथे समारोप होणार आहे. त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
देवळाली, गुहा, राहुरी फॅक्टरी, चिंचविहिरे, गणेगाव, आंबीअमळनेर, जाताप आदी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत