सावकारकीच्या तक्रारीचा रागातून राहुरी फॅक्टरीत महिलेला शिवीगाळ व धमकी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सावकारकीच्या तक्रारीचा रागातून राहुरी फॅक्टरीत महिलेला शिवीगाळ व धमकी

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- सावकारकी संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका महिलेला घरासमोर येऊन शिवीगाळ करत धमकावल्याची घटना राहु...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

सावकारकी संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका महिलेला घरासमोर येऊन शिवीगाळ करत धमकावल्याची घटना राहुरी फॅक्टरी परिसरात घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलीम इलियास पठाण (वय ३४, रा. राहुरी फॅक्टरी) यांनी १३ एप्रिल २०२६ रोजी सावकारकी संदर्भात तक्रार दिली होती. त्याचाच राग मनात धरून १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश सोनवणे (पूर्ण नाव माहीत नाही) हा फिर्यादीच्या घरासमोर आला.

त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या फिर्यादीच्या भावजई शिरीन मुन्ना पठाण यांच्या समोर आरोपीने त्यांना उद्देशून अश्लील शिवीगाळ केली. “माझ्याविरोधात तक्रार करता का?” असे म्हणत पुढे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, सावकारकीच्या व्यवहारातूनही वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. सोनवणे याच्याकडून सलीम पठाण यांनी २० हजार रुपये २० टक्के व्याजदराने घेतल्याचे सांगितले जाते. त्यापोटी सुमारे २४ हजार रुपये परत करूनही संबंधिताने फिर्यादीच्या नावावरील दुचाकी बळकावल्याचा तसेच “पोलीस काही करू शकत नाहीत” अशा प्रकारची दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत