देवळाली प्रवरा(वेबटीम) श्री क्षेत्र मोशी (आळंदी) येथे आयोजित वेदमुर्ती परीक्षेत देवळाली प्रवरा येथील आदित्य कुलकर्णी याने प्रथम श्रेणीत यश स...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
श्री क्षेत्र मोशी (आळंदी) येथे आयोजित वेदमुर्ती परीक्षेत देवळाली प्रवरा येथील आदित्य कुलकर्णी याने प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदित्य हा देवळाली प्रवरा येथील विजयवेदमुर्ती परीक्षेत देवळाली प्रवराच्या आदित्य कुलकर्णी चे उल्लेखनीय यश मधुकर जोशी गुरु यांचा नातू असून दिनेश जोशी यांचा भाचा आहे. तसेच श्रीरामपूर येथील गणेश शंकरराव कुलकर्णी यांचा तो मुलगा आहे.
ही वेदमुर्ती परीक्षा स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली नरसोबाचीवाडी (कोल्हापूर) येथे संपन्न झाली. या परीक्षेसाठी आदित्यला अर्थव जोशी गुरु यांचे मार्गदर्शन लाभले.आदित्यच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत