राहुरी/वेबटीम:– राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक...
राहुरी/वेबटीम:–
राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले असून, तेजस सनादी यांच्यासह ११ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
दि. २३ फेब्रुवारी रोजी एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर व मॅकलॉईड फार्मा (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट प्रक्रियेत महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या एकूण १२ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.
यापैकी पियुष आडेकर, प्रसाद औटी, स्वयंम धारकर, सौरभ गायकवाड, कदम, रोहित नागले, अनुज पळसे, तेजस सनदी व ऋषीकेश सांगळे या नऊ विद्यार्थ्यांची मॅकलॉईड्स फार्मास्युटिकल्सच्या गुणवत्ता नियंत्रण विभागासाठी, तर त्रिलोक शेळके, सिद्धांत लांबे व गिरीश आव्हाड या तीन विद्यार्थ्यांची उत्पादन विभागासाठी निवड झाली आहे.
सदर कॅम्पस ड्राइव्हमध्ये लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत व वैयक्तिक मुलाखत अशा विविध टप्प्यांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण तनपुरे, उपाध्यक्ष भारत वारुळे, खजिनदार भास्कर ढोकणे, संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नागरगोजे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत