ज्येष्ठ नागरिक सिताराम घाडगे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ज्येष्ठ नागरिक सिताराम घाडगे यांचे निधन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ नागरिक सिताराम रंगनाथ घाडगे (आण्णा) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील ज्येष्ठ नागरिक सिताराम रंगनाथ घाडगे (आण्णा) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने घाडगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

आण्णा हे साध्या, शांत व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित होते. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करून कुटुंब उभे केले. त्यांच्या निधनामुळे  शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार शिवाजी घाडगे व रंगनाथ घाडगे यांचे वडील होत.

त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता राहुरी फॅक्टरी येथील कारखाना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत