वेदविद्येत कणगरच्या तनय नवलेची झेप; वेदमूर्ती परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वेदविद्येत कणगरच्या तनय नवलेची झेप; वेदमूर्ती परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथील तनय प्रकाश नवले याने श्री क्षेत्र मोशी (आळंदी) येथे आयोजित वेदमुर्ती परीक्षेत प्रथम श्रेणीत दैद...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील कणगर येथील तनय प्रकाश नवले याने श्री क्षेत्र मोशी (आळंदी) येथे आयोजित वेदमुर्ती परीक्षेत प्रथम श्रेणीत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अचूक, स्वच्छ आणि प्रभावी वेद उच्चारांनी परीक्षकांवर ठसा उमटवत तनयने आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तनय हा वेदसंपन्न प्रकाश नवले गुरु यांचा सुपुत्र असून प्रवीण नवले गुरु यांचा पुतण्या आहे. घरातील वैदिक परंपरेचा वारसा आणि स्वतःची जिद्द याच्या जोरावर त्याने हे यश गाठले.

ही वेदमुर्ती परीक्षा स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाली. या प्रवासात तनयला गोविंद जोशी(औंढा नागनाथ) गुरु यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तनयच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत