देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांच्यावतीने वार्षिक श्री साई उत्सव तपपूर्ती व...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांच्यावतीने वार्षिक श्री साई उत्सव तपपूर्ती व श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य श्री राम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दि. ४ मे ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत बाजारतळ येथे पार पडणार असून, दररोज सायंकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत कथा होणार आहे.
या कथामालेचे प्रमुख कथाकार म्हणून रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक (नागपूर) उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या प्रभावी आणि भावपूर्ण शैलीतून रामायणातील विविध प्रसंगांचे सजीव वर्णन केले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळणार आहे.
कथामालेत श्रीराम जन्म, शिव-पार्वती विवाह, सीता स्वयंवर, केवट प्रसंग, भरत-राम भेट, लंका दहन आणि श्रीराम राज्याभिषेक असे विविध महत्त्वाचे प्रसंग उलगडले जाणार आहेत.
महंत उद्धवजी महाराज मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, शेवटच्या दिवशी मंगळवार ११ मे रोजी सायंकाळी मंडलिक महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री राम कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासीयांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत