राहुरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव सूर्यभान आढाव सर यांचे वळण येथे शनिवार (...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव सूर्यभान आढाव सर यांचे वळण येथे शनिवार (९ मे) रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विठ्ठलराव आढाव यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या जाण्याने धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्यावर रविवार (१० मे) रोजी सकाळी १० वाजता वळण, ता. राहुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील आदित्य ट्रेडिंग कंपनीचे बाळासाहेब आढाव व ज्ञानेश्वर आढाव यांचे ते वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत