संभाजीनगर/वेबटीम:- छत्रपती संभाजीनगर येथील दीपक लॉन्स येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भीमराव ढुस यांचे चिरंजीव चि. प्रसाद ढुस आणि चि. स...
संभाजीनगर/वेबटीम:-
छत्रपती संभाजीनगर येथील दीपक लॉन्स येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भीमराव ढुस यांचे चिरंजीव चि. प्रसाद ढुस आणि चि. सौ. का. पूजा यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या शाही विवाह सोहळ्यास महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, कला, उद्योग तसेच सोशल मीडिया क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.
विवाह सोहळ्याची आकर्षक सजावट, पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेले नियोजन तसेच उपस्थित मान्यवरांची मोठी गर्दी यामुळे हा विवाह सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरला. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख असलेले आप्पासाहेब ढुस तसेच त्यांचे चिरंजीव आणि ‘अंत अस्ति प्रारंभ’ या पुस्तकाचे लेखक तथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वैभव ढुस यांचा मोठा मित्रपरिवार या कार्यक्रमास उपस्थित होता.
या प्रसंगी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, भाजपचे गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, उद्योजक दत्तात्रय दरंदले, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे, शिवसेनेचे ज्योतिराम पाटील, रॉयल उद्योग समूहाचे संस्थापक अभि गायकवाड, राज बनकर, ओंकार सातपुते, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, यांच्यासह देवळाली नगरपालिका व सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी नवदांपत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली.
दरम्यान, विवाह सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या सर्व मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वैभव ढुस यांनी आभार मानले. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची परिसरात सर्वत्र चर्चा रंगत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत