राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणास अडवून शिवीगाळ, मारहाण व धमकी देत गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घट...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
याबाबत युवराज तनपुरे रा. तनपुरे वाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सागर ज्ञानदेव गडाख व रामेश्वर उर्फ दादासाहेब हंसराज गडाख यांच्याशी जुना वाद आहे.
दि. ८ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी हे कन्हैया लॉन्स,जातप राहुरी येथे एका हळदी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तेथे सागर ज्ञानदेव गडाख, रामेश्वर उर्फ दादासाहेब हंसराज गडाख उपस्थित होते. आरोपींनी फिर्यादी यांना अडवून “तू एवढ्या लवकर जमिनीवर कसा काय बाहेर आला” असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी आरोपीला “आज कार्यक्रम आहे,आपण काय असेल ते नंतर बघू”असे म्हटले असता आरोपींनी फिर्यादीस हाताने मारहाण केली. तसेच रामेश्वर गडाख याने फिर्यादी यांच्या पोटाला गावठी कट्टा लावून धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, तसेच सागर गडाख याने फिर्यादी यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर फिर्यादी यांनी किरण विठ्ठल पठारे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी रामेश्वर उर्फ दादासाहेब हंसराज गडाख, सागर ज्ञानदेव गडाख यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत