राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील कन्हैया मंगल कार्यालय जातप येथील मंगल कार्यालयात झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान जुन्या भांडणाच्या का...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील कन्हैया मंगल कार्यालय जातप येथील मंगल कार्यालयात झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन जबरदस्तीने काढून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रविंद्र रघुनाथ गडाख (रा. देवळाली प्रवरा गडाख वस्ती, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, ८ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जातप येथील मंगल कार्यालयात त्यांच्या भाच्याच्या हळदी कार्यक्रमासाठी नातेवाईक जमले होते. यावेळी आरोपी युवराज तनपुरे व त्याच्या सोबत आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जुन्या वादाच्या कारणावरून रामेश्वर गडाख व सागर गडाख यांना शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपींनी रामेश्वर गडाख यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळ्यांची सोन्याची चैन तसेच सागर गडाख यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाले.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात युवराज तनपुरे व दोन अनोळखी व्यक्तींविरोधात मारहाण, धमकी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत