NCMC स्मार्ट कार्ड वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद : प्रकाश संसारे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

NCMC स्मार्ट कार्ड वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद : प्रकाश संसारे

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सवलतीच्या दरात वापरता येणाऱ्या NCMC स्मार्ट कार्डचे वाटप आज योगभवन, वैष्ण...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सवलतीच्या दरात वापरता येणाऱ्या NCMC स्मार्ट कार्डचे वाटप आज योगभवन, वैष्णवी चौक येथे  गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रकाश संसारे म्हणाले, “वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेला NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामान्य नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”


वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने एप्रिल महिन्यात ४, ६ व १२ तारखेला योगभवन येथे NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ८०० नागरिकांनी नोंदणी केली होती. आज या स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच रविवार दि. १७ मे रोजी पुन्हा स्मार्ट कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


यावेळी नगरसेवक वसंत कदम, हिंदूरक्षक धर्म परिषदेचे दत्ता गागरे, सुयोग शिंदे, सुजित सिनारे, जालिंदर दोंड, अमोल कदम, महेंद्र दोंड, बाबा मोरे, राकेश बोरसे, नितीन मोरे तसेच वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत