रात्री 10 नंतर वाद्य वाजवल्यास गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रात्री 10 नंतर वाद्य वाजवल्यास गुन्हा दाखल

राहुरी(वेबटीम) अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यां...

राहुरी(वेबटीम)



अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील साउंड सिस्टिम चालक, मालक तसेच मंगल कार्यालय चालकांची बैठक घेतली.

ही बैठक आज 11 मे 2026 रोजी पार पडली. बैठकीत रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी तसेच वाद्य वाजविण्यास बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नियमांचे उल्लंघन झाल्यास साउंड सिस्टिम चालक, मालक, मंगल कार्यालय मालक तसेच संबंधित ग्राहक किंवा आयोजकांवर ध्वनी प्रदूषण कायदा 2002 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला.

तसेच सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत