राहुरी फॅक्टरीच्या खेळाडूंची राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या खेळाडूंची राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) छत्रपती संभाजीनगर येथे ९ मे रोजी पार पडलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत अहिल्यानगर संघाने ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



छत्रपती संभाजीनगर येथे ९ मे रोजी पार पडलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत अहिल्यानगर संघाने प्रथम मानांकन मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत राहुरी फॅक्टरी येथील शिवनेरी क्लबच्या खेळाडूंची ४५ व्या राष्ट्रीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

तेलंगणा राज्यातील मेहबूबाबाद येथे १२, १३ व १४ मे २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुलींच्या गटातून कुमारी सानिका किरण कोबरणे, श्वेताली दत्तात्रय गोपाळे व जान्हवी सोमनाथ जाधव यांची तर मुलांच्या गटातून ऋषिकेश पिलोरे यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.

यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सानिका किरण(पिनू) कोबरणे हिची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या निवडीमुळे राहुरी फॅक्टरी परिसरासह अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशस्वी खेळाडूंना अम्युचर शूटिंग व्हॉलीबॉल राज्य फेडरेशनचे सचिव सुनिल कंठाळे, राज्य फेडरेशनचे सदस्य नाना काळे, अहिल्यानगर जिल्हा शूटिंग व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक शेख तसेच प्रशिक्षक राजेंद्र पुजारी व संदीप निबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. खेळाडूंच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत