विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात उडी घेऊन सर्वोच्च स्थान प्राप्त करावे- नगराध्यक्ष सत्यजित कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात उडी घेऊन सर्वोच्च स्थान प्राप्त करावे- नगराध्यक्ष सत्यजित कदम

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-  वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान च्या वतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळेतील  इ 10 व 12 वी च्या परीक्...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- 

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान च्या वतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळेतील  इ 10 व 12 वी च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

वैष्णवी चौक परिसरातील योगभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमास देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष  श्री सत्यजित कदम, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत इंडस्ट्री ऑफीसर म्हणून निवड झालेले श्री संदीप येवले,प्रीतीताई कदम,नगरसेवक राजेंद्र लोखंडे,नगरसेविका चंदारानी गाडे,नगरसेवक वसंत कदम,वैभव गाडे,शरद खांदे आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देवळाली प्रवरा न्यू इंग्लिश स्कूल, वाणी सेंट्रल स्कूल,डीपॉल इंग्लिश मीडियम स्कूल,छत्रपती शिवाजी हायस्कूल राहुरी फॅक्टरी आदी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष सत्यजित कदम,संदीप येवले व प्रीती कदम या मान्यवरांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन नगरसेवक वसंत कदम यांनी केले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुजित लोंढे,उपाध्यक्ष नितीन मोरे,मनोज कदम,अमोल कदम,महेंद्र दोंड,संतोष कदम,जालिंदर दोंड,मनोज गावडे,संजय धुमाळ,मयुर मोरे,सुजित सिणारे,बाबासाहेब खांदे,प्रसाद कदम व  वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत