राहुरी फॅक्टरी येथे शनैश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे शनैश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर, शनैश्वर देवस्थान येथे शनैश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोज...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील जुने हनुमान मंदिर, शनैश्वर देवस्थान येथे शनैश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता अभिषेक सोहळा संपन्न होणार असून सायंकाळी ६ वाजता महंत ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे यांच्या उपस्थितीत जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

या कीर्तनासाठी संतपूजन श्री. होशाबापू रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कै.एकनाथ महिपती येवले यांच्या स्मरणार्थ श्री. अविनाश हरिभाऊ येवले यांच्याकडून महाप्रसाद पंगत दिली जाणार आहे.


भाकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत