राहुरी फॅक्टरी(वेबटीम) कट्टर शिवसैनीक विजय गव्हाणे यांची आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे राहुरी तालुक्याचे प्रभारी तालुका प्रमुख ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
कट्टर शिवसैनीक विजय गव्हाणे यांची आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे राहुरी तालुक्याचे प्रभारी तालुका प्रमुख नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र आज जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र दळवी यांनी श्री विजय गव्हाणे यांना सुपुर्त केले.
विजय गव्हाणे हे १९९३ पासुन शिवसैनीक म्हणुन काम केले असुन त्यांनी शहराध्यक्ष राहुरी कारखाना तसेच देवळाली प्रवरा ३२ गावे तालुकाप्रमुख म्हणुन काम पाहिले आहे. अंत्यत निष्ठावान,धाडसी तसेच लोकांचे मदतीला धावुन जाणारे व्यक्तीमत्व म्हणुन विजय गव्हाणे यांचा नावलौकिक आहे.
त्यांची निष्ठा व काम लक्षात घेवुन त्यांची निवड केल्याचे जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र दळवी यांनी नमुद करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री विजय गव्हाणे यांचे निवडीने निष्ठावंताला न्याय मिळाल्याचा भावना शिवसैनीक व्यक्त करत असुन संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या निवडीचेवेळी शिवसेनेचे दत्ता कडुपाटील , राहुल चौथे, बाळासाहेब शिंदे, सचिन लाटे विजय कुमावत तसेच सचिन मोरे हे उपस्थित होते.
पक्ष बांधणी व पक्षसंघटन मजबुत करुन सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करण्याचे श्री विजय गव्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत