तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरण पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला* - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण प्रकरण पवार यांचा जामीन अर्ज फेटाळला*

अहिल्यानगर(वेबटीम) खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण  केल्‍याच्‍या कारणामुळे न्याय...

अहिल्यानगर(वेबटीम)



खासदार निलेश लंके यांच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण  केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला चिंचोडी पाटीलचा सरपंच आणि खासदार निलेश लंके समर्थक आरोपी शरद खंडू पवार याचा जामिन अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्‍य न्‍याय दंडाधिकारी एस आर शिंदे  यांनी फेटाळला आहे.


   सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोस्ट केल्‍याचे कारणाने किशोर महादेव परभणे यांचे अपहरण करुन, त्‍यांना खोलीत डांबून ठेवत अमानुष मारहान केल्‍याची घटना घडली होती. त्‍यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे यांच्‍यावर ४ मे २०२६ रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्‍याबाबत सोशल मिडीयावर व्‍हीडीओ पोष्‍ट केल्‍याच्या रागातून अपहरण आणि मारहाणीची घटना घडली होती.


      या घटने संदर्भात पोलिसांनी शरद खंडू पवार यास अटक करुन, अहिल्‍यानगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे  यांच्या  न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पवार हा कोठडीत असताना तपासी अधिका-यांना या संदर्भात उडवा उडवीचे उत्‍तर देत समाधानकारक माहीती न दिल्‍याने पोलिसांनी त्‍यास पुन्‍हा न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. 


जामीन मिळावा म्‍हणून, शरद खंडू पवार याने न्‍यायालयात प्रयत्‍न केले होते. याबाबतची सुनावणी अहिल्‍यानगर येथील अतिरिक्‍त  न्‍यायदंडाधिकारी श्री एस आर शिंदे कोर्ट क्रमांक 17 यांच्‍यासमोर झाली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड.आनंद व्‍यवहारे यांनी बाजू मांडली तर, सरकार पक्षाच्‍या वतीने अॅड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्‍मण वाडेकर यांनी बाजू मांडून शरद पवार यांच्‍या जामीण अर्जास विरोध केला.


       न्‍यायालयाने दोन्‍हीही बाजूचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यानंतर शरद खंडू  पवार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता या घटनेत शरद खंडू पवार याच्‍या चौकशीतून बरेच कारनामे समोर येण्‍याची शक्‍यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत