मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलशान पठाण बिनविरोध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलशान पठाण बिनविरोध

मानोरी/वेबटीम:- मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलशान चांदभाई (मेजर) पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड रेणुका माता शेतकरी वि...

मानोरी/वेबटीम:-

मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलशान चांदभाई (मेजर) पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड रेणुका माता शेतकरी विकास मंडळासाठी मोठे यश मानले जात आहे.

ही निवड विद्यमान सरपंच सौ. ताराबाई वाघ, माजी सरपंच अब्बासभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पोटे, निवृत्ती आढाव व संपत थोरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांनी एकजूट दाखवत उपसरपंच पदाची निवड बिनविरोध केली.

निवडीनंतर ग्रामपंचायत सदस्यांनी रेणुका माता शेतकरी विकास मंडळाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. दिलशान पठाण यांच्यासह शामराव आढाव, एकनाथ आढाव, कारभारी बर्डे, वैशाली खुळे, अलका भिंगारे, हिराबाई भिंगारे आणि रंजना बाचकर हे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत