गुहा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री मारुती मंदिर प्रांगणात सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य धार्मिक कार्यक्रमाचे...
गुहा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री मारुती मंदिर प्रांगणात सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विष्णुसहस्रनाम अनुष्ठान सांगता, अकरा कुंडी विष्णू याग, श्री सत्यनारायण पूजा तसेच तीर्थयात्रेच्या परिपूर्णतेनिमित्त हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.
गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या धार्मिक अनुष्ठानाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात येणार असून, यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार श्री संकेत शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनानंतर श्री विष्णुसहस्रनामाचा सामुदायिक पाठ होणार असून, सर्व भाविक भक्तांसाठी गाव धोंड्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमामुळे गुहा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आयोजकांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच श्री विष्णू याग व अनुष्ठानाच्या पुण्यफळाचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
वेळेअभावी व बदलत्या कालमानानुसार प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण देणे शक्य नसल्याने सर्वांनी हेच आग्रहाचे आमंत्रण समजून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री सोमनाथ काशिनाथ कुलकर्णी गुरुजी, मुक्काम पोस्ट गुहा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यांनी केले आहे.
📍 स्थळ : श्री मारुती मंदिर प्रांगण, गुहा
📞 संपर्क : ९८२३५०६२३५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत