राहुरी फॅक्टरीतील प्रसाद लोखंडेंना मारहाण सोन्याची चैन लंपास,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील प्रसाद लोखंडेंना मारहाण सोन्याची चैन लंपास,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरात एक युवकाला अडवून शिवीगाळ करत मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची घटना घडली असून याप्र...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी परिसरात एक युवकाला अडवून शिवीगाळ करत मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची घटना घडली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रसाद कारभारी लोखंडे रा.सोमेश्वर वसाहत राहुरी फॅक्टरी,ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २४ मे रोजी रात्री सुमारे आठ वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका परिसरात मोबाईलवर बोलत उभे असताना आरोपी गोरक्षनाथ नरोडे, रावसाहेब लोंढे आणि विकी नरोडे सर्व राहणार प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी यांनी प्रसाद लोखंडे यांना अडवले आरोपींनी गाडीचा मालक कोण आहे असे विचारत सुरुवातीला शिवीगाळ केली त्यानंतर वाद वाढवत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत प्रसाद लोखंडे यांच्या डोक्यावर गळ्यावर तसेच पाठीवर दुखापत झाली आहे.

दरम्यान परिसरातील सुरेश शिंदेने मध्यस्थी करत फिर्यादीची सुटका केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बागुल हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत