बेकायदेशीर ड्रोनविरोधात कारवाईची मागणी,नगराध्यक्ष सत्यजित कदम, आप्पासाहेब ढूस व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी घेतली जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बेकायदेशीर ड्रोनविरोधात कारवाईची मागणी,नगराध्यक्ष सत्यजित कदम, आप्पासाहेब ढूस व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी घेतली जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट.

अहिल्यानगर(वेबटीम) राहुरी तालुका व परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्म...

अहिल्यानगर(वेबटीम)



राहुरी तालुका व परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या बेकायदेशीर ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस आणि पत्रकार शिवाजी घाडगे यांनी मंगळवार दि. २६ मे रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची संयुक्तरित्या भेट घेऊन अवैध ड्रोनच्या वाढत्या हालचालींबाबत गंभीर चिंता व्यक्त करून कारवाईची मागणी केली.

      यावेळी शिष्टमंडळाने राहुरी तालुक्यात अलीकडे रात्री अपरात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगितले. काही भागांमध्ये चोरीच्या घटनांपूर्वी ड्रोन दिसल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, या प्रकारांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर त्वरीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

      शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेतली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाईचे निर्देश देत अँटी ड्रोन गनच्या माध्यमातून अवैध ड्रोन शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहून रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशा सूचनाही करण्यात केल्या.

दरम्यान, प्रशासनाने अवैध ड्रोन उडविणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. राहुरी तालुक्यातील नागरिकांनी देखील संशयास्पद ड्रोन अथवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


  *दोन कट्टर विरोधक एकत्र*

देवळाली प्रवरा शहरात नगराध्यक्ष कदम व आप्पासाहेब ढुस हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून सर्वश्रुत होते. मात्र ढुस यांचे चिरंजीवाच्या विवाहाला नगराध्यक्ष कदम यांनी हजेरी लावली.त्यानंतर अनेक कार्यक्रमात कदम व ढुस एकत्र चर्चा करताना पहावयास मिळाले. तर आज जनतेच्या समस्येवर दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन प्रशासनास निवेदन दिल्याचा फोटो व्हायरल होताच अनेक राजकीय जाणकारांच्या नजरा विस्फारलेल्या पहावयास मिळाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत