देवळाली प्रवरा येथे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या 2002 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या 2002 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे सन 2002 मध्ये इयत्ता दहावीचे शिक...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे सन 2002 मध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

दीर्घ काळानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला. या स्नेहमेळाव्यात मैत्री, आठवणी आणि जुन्या सहवासाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल मुसमाडे, सचिन रणधीर, सुजाता वारुळे, रुपेश कुर्हे,हेश गडाख, सोमनाथ मुसमाडे, प्रशांत चव्हाण आणि अमजद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. कडू सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गडाख यांनी केले. यावेळी दादासाहेब वाळुंज यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन रणधीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीराताई मोरे यांनी मानले.

स्नेहमेळाव्यामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली असून, कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत