माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सोशल मीडिया डीपीवर ‘मामा’ जयंत पाटील यांचा फोटो! आता 'मामा म्हणल तस का'?, राजकीय चर्चांना उधाण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सोशल मीडिया डीपीवर ‘मामा’ जयंत पाटील यांचा फोटो! आता 'मामा म्हणल तस का'?, राजकीय चर्चांना उधाण

राहुरी/वेबटीम:- माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ‘मामा’ असलेले...

राहुरी/वेबटीम:-

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ‘मामा’ असलेले जयंत पाटील यांचा फोटो ठेवल्याने राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय पातळीवर रंगत होत्या. त्याचबरोबर येत्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.त्यामुळे तनपुरे यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यांपूर्वी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीनुसार त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.

आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच त्यांनी अचानक सोशल मीडिया डीपीवर जयंत पाटील यांचा फोटो ठेवत राजकीय संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या बदललेल्या डीपीमागे नेमका राजकीय संदेश काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून आगामी काही दिवसांत तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मामा म्हणल तस की आता वेगळं काही याची चर्चा सूरु आहे.


मामा जयंत पाटील यांच्यामुळे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते परंतु ते आज किंवा उद्या भाजपात जाण्याची शक्यता आहे. पण मामामुळे मी घडलो नगराध्यक्षचा आमदार नव्हे तर मंत्री झालो यामुळे की काय जाणीव म्हणून हा डीपी ठेवला अशी चर्चा होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत