देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र तुळजापूर पायी दिंडीच्या तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र तुळजापूर पायी दिंडीच्या तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा (पिंपळाचा मळा) येथे श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र तुळजापूर या पायी द...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा (पिंपळाचा मळा) येथे श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र तुळजापूर या पायी दिंडी सोहळ्याचा तपपूर्ती सोहळा २०२६ मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. वैकुंठवासी श्रीहरी महाराज भालेराव यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेल्या या तुळजापूर पायी दिंडी सोहळ्याला यंदा १२ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजता ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे यांच्या प्रवचनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता श्री दुर्गा सप्तशती पाठ (वाचन) होणार असून, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत देवीची गाणी व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्रीगुरु ह.भ.प. महंत अर्जुनजी महाराज तनपुरे यांचे जाहीर हरी कीर्तन होणार आहे. या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी, ग्रामस्थ, भजनी मंडळे तसेच विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले आहे. धार्मिक व भक्तीमय वातावरणात होणाऱ्या या तपपूर्ती सोहळ्यामुळे देवळाली प्रवरा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण देवळाली प्रवरा (पिंपळाचा मळा), गणेगाव रोड, कदम पाटील वस्ती, ता. राहुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत