लिंबाजी इंगवले यांची मानव अधिकार संरक्षण समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लिंबाजी इंगवले यांची मानव अधिकार संरक्षण समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती

राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हा संघटक पदाची जबाबदा...

राहुरी(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे लिंबाजी लोभाजी इंगवले यांची समितीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे देवळाली प्रवरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



मानव अधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाठीया, प्रदेश जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. तसेच उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी डॉ. विजय बापू पाटील यांच्या हस्ते इंगवले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

लिंबाजी इंगवले यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा संघटक म्हणून काम करताना विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांचे हक्क, गरजू नागरिकांना मदत, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत समितीने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीनंतर इंगवले यांनी समितीच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासन प्रशासनापर्यंत पोहोचवून मानवाधिकार संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत