देवळाली प्रवराच्या सुनील कदम यांच्या निधनाने मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या सुनील कदम यांच्या निधनाने मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुनिल बाळासाहेब कदम (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते एचडीएफ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुनिल बाळासाहेब कदम (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते एचडीएफसी बँकेच्या मिरजगाव शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.

स्व. सुनील कदम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव असल्यामुळे देवळाली प्रवरा शहरात त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता.

त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेकांनी “एक सच्चा मित्र हरपला” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

गुरुवारी कदम वस्ती येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. सुनील कदम यांच्या निधनाने देवळाली प्रवरा परिसरातील सामाजिक व मित्रपरिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत