देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील आंबी स्टोअर रोडवरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शहादावल बाबा दर्गा,यांचा यात्रा उत्सव (उरूस) साला...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील आंबी स्टोअर रोडवरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शहादावल बाबा दर्गा,यांचा यात्रा उत्सव (उरूस) सालाबादप्रमाणे मंगळवार दि. ५ मे रोजी संपन्न होणार असल्याची माहिती दर्गाहाचे सर्वेसर्वा अकील बाबा पटेल यांनी दिली.
"हजरत शाहदावल मलिक बाबा" यांच्या ऊरूसानिमीत्त, विविध तरूण मंडळे, धर्म गुरू, समाजसेवक, व सर्व मान्यवरांच्या वतीने अजमेर (राजस्थान) येथून आलेली पवित्र चादर मंगळवार दि. ५ मे रोजी सायं. ७:१५ वा. अर्पण करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व धर्म समभाव हा विचार कार्य करतो व जोपासला जातो.
दरगाह परिसरात ऊरूस निमीत्त लंगर, भंडारा प्रसादाचे आयोजन रात्री ७:३० ते ९:३० वा. करण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रसिद्ध कव्वाल जलाल अली अजमेरी यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे. तरी या ऊरूसा निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन अकिल बाबा पटेल परिवार व दर्गाह खादीम कमेटी च्या वतिने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत