डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या इसमाविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या इसमाविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी(वेबटीम)  डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका इसमाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मि...

राहुरी(वेबटीम)



 डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका इसमाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मिठु शिंदे (वय ३५ रा. कात्रड, ता. राहुरी) याने दि. ०२ मे २०२६ रोजी  एमरजन्सी डायल 112 वर कॉल करून राहुरी येथे काही लोक मारहाण करत असून त्यांच्या हातात काठ्या-कुऱ्हाडी असल्याची खोटी माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासात अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीत संबंधित इसमाने दारूच्या नशेतून चुकीची माहिती दिल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा वेळ व संसाधनांचा अपव्यय झाल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत  पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम. पोलीस नाईक अशोक कुदळे तपास करत आहे.

राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपत्कालीन सेवांचा गैरवापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत