राहुरी फॅक्टरीतील योगा भवन येथे ३मेपासून मोफत वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील योगा भवन येथे ३मेपासून मोफत वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक परिसरातील योगा भवन येथे हिंदू रक्षक धर्म परिषद, इच्छापूर्ती प्रतिष्ठान तसेच वारकरी स...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक परिसरातील योगा भवन येथे हिंदू रक्षक धर्म परिषद, इच्छापूर्ती प्रतिष्ठान तसेच वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १० मे २०२६ या कालावधीत मोफत वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन ३ मे रोजी संत कवी महिपती महाराज देवस्थान, ताहाराबादचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे तसेच शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांच्या हस्ते होणार आहे.

शिबिरामध्ये श्रीमद्भगवद्गीता अभ्यास, योगा व प्राणायाम, संथा, प्रार्थना, हनुमान चालीसा, टाळ-मृदुंग, हरिपाठ, ओव्या, वारकरी भजने, श्लोक तसेच विविध धार्मिक व्याख्यानांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराच्या कालावधीत संजय महाराज पाचपोर व आदिनाथ महाराज शास्त्री यांचीही उपस्थिती राहणार आहे.

शिबिराची सांगता १० मे रोजी महंत माधवगिरी महाराज व साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था दानशूर मंडळींच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, अध्यात्मिक मूल्ये व वारकरी परंपरेची जाणीव वाढीस लागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत