राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील भूमिपुत्र व राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या मराठी माध्यमातील शाळेचे माज...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील भूमिपुत्र व राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या मराठी माध्यमातील शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
पंधरा वर्षांच्या प्रामाणिक, निष्ठावंत सेवेबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस खात्यातील हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
गणेगाव ते राहुरी फॅक्टरी हा दररोजचा शिक्षण प्रवास त्यांनी सायकलवर पूर्ण केला. ऊन, वारा, पाऊस, थंडी—कुठल्याही अडथळ्यांनी त्यांच्या जिद्दीला कधीही रोखू शकले नाही.
शेतकरी कुटुंबात वाढताना वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवत त्यांनी स्वतःच्या मेहनतीने यशाची उंची गाठली. संकटांना न जुमानता सकारात्मकतेने पुढे जाण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
सन 2021 मध्ये एमपीएससी मार्फत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले. सोलापूर व ठाणे येथे प्रामाणिक सेवा बजावत सध्या ते ठाणे शहरात कार्यरत आहेत.
आजही आपल्या मातीशी नातं जपत, जुन्या मित्रांशी संवाद ठेवत आणि तरुणांना मार्गदर्शन करत ते समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत.
या यशाबद्दल गणेगावचे सरपंच शोभा भनगडे, अमोल भनगडे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत