धनादेश न वटल्याप्रकरणी साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्जदारांस शिक्षा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धनादेश न वटल्याप्रकरणी साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्जदारांस शिक्षा

राहुरी(वेबटीम) राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेतून कर्ज घेतलेल्या दोन जणांविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने दंड व ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या शाखेतून कर्ज घेतलेल्या दोन जणांविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने दंड व शिक्षेचा आदेश दिला आहे.

या प्रकरणात राहुरी खु. (ता. राहुरी) येथील संतोष भाऊसाहेब वाघमारे व दाढ बु. (ता. राहाता) येथील संदीप रावसाहेब चव्हाण यांनी संस्थेकडून कर्ज घेतले होते. मात्र ठरलेल्या वेळेत कर्जाची परतफेड न केल्याने थकबाकी निर्माण झाली. वसुलीसाठी संस्थेचे कर्मचारी गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी अनुक्रमे ६८,००० रुपये व ३३,००० रुपयांचे धनादेश देत ते वटतील अशी हमी दिली होती. मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटले नाहीत.

यानंतर साई आदर्श संस्थेच्या वतीने अहिल्यानगर येथील न्यायालयात नि.इ. अॅक्ट कलम १३८ अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होऊन पुरावे व साक्षींचा विचार करण्यात आला. संस्थेच्या वतीने किरण रसाळ यांची साक्ष नोंदवण्यात आली तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली.

सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी संतोष वाघमारे यांना ९५,००० रुपये नुकसानभरपाई व ती न भरल्यास एक महिना कारावास, तसेच आरोपी संदीप चव्हाण यांना ४०,००० रुपये नुकसानभरपाई व ती न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. संबंधित रक्कम निकालाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा निकाल अहिल्यानगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या मा. न्यायमूर्ती श्रीमती प्र.तु. शेजवळ–काळे यांनी दिला. फिर्यादी संस्थेच्या वतीने अॅड. अक्षय दिलीप शेळके यांनी काम पाहिले असून अॅड. दिलीप शेळके व अॅड. प्रिया काळे यांनी त्यांना सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत