गणेगावात २ ते २५ मेदरम्यान वसंत बालसंस्कार शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगावात २ ते २५ मेदरम्यान वसंत बालसंस्कार शिबिर

राहुरी(वेबटीम) तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही २ ते २५ मे २०२६ या कालावधीत भव्य वसंत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्य...

राहुरी(वेबटीम)



तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही २ ते २५ मे २०२६ या कालावधीत भव्य वसंत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांना संस्कार, अध्यात्म आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा संगम अनुभवायला मिळणार आहे.

वेदांताचार्य स्वामी संजय महाराज व वेदांताचार्य स्वामी विजय महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत शिबिर पार पडणार आहे. शिबिरामध्ये नमन, श्रीमद् भगवद्गीता अभ्यास, योगासने, हनुमान चालीसा पठण, इंग्रजी व्याकरण, संस्कृत प्रवेश, सुभाषित परिचय, नामजप, मृदंगवादन, खेळ, दंड, भजन तसेच टाळ-पावलांसह हरिपाठ यांसारख्या विविध उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शनिवार, २ मे रोजी सकाळी ८ वाजता या शिबिराचे उद्घाटन हरेश महाराज पाटील (आळंदी) यांच्या हस्ते होणार आहे.


 शिबिरादरम्यान महंत उद्धव महाराज मंडलिक, विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, महंत अर्जुन महाराज तनपुरे, लक्ष्मण महाराज देशमुख, बाळकृष्ण महाराज कांबळे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उद्योजक विजयकुमार सेठी, डॉ. प्रताप गिरगुणे, डॉ. दीपा कुसळकर, नामदेव महाराज शास्त्री, दीपक गायके आदी मान्यवर भेट देणार आहेत.


सोमवार, २५ मे रोजी सायंकाळी शिबिराची सांगता होणार असून, या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेदांत गुरुकुल तसेच गणेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत