देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भागवत बाळासाहेब मुंगस...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भागवत बाळासाहेब मुंगसे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज मंगळवार (२८ एप्रिल) रोजी सायंकाळी ६ वाजता देवळाली प्रवरा येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
भागवत मुंगसे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. नुकत्याच पार पडलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी रावसाहेब खेवरे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
त्यांच्या निधनामुळे शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली असून, एक निष्ठावान आणि कार्यतत्पर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत