राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा हद्दपार करण्यात आलेला आरोपी निखिल बबन लाटे हा विना नंबर प्लेट डंपरद्वारे अवैधरित्या वाळू...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा हद्दपार करण्यात आलेला आरोपी निखिल बबन लाटे हा विना नंबर प्लेट डंपरद्वारे अवैधरित्या वाळू चोरी करत असताना राहुरी पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडला. या कारवाईदरम्यान सुमारे ३२ लाख रुपये किंमतीचा हायवा डंपर व वाळू जप्त करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, सतीश आवारे आदींच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत