कणगर येथे १४ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथे १४ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण

राहुरी(वेबटीम)  कणगर (ता. राहुरी) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा तसेच केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवल...

राहुरी(वेबटीम)



 कणगर (ता. राहुरी) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा तसेच केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा गुरुवार, १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.

या सोहळ्यास जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आरपीआयचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील सलबे, विभागीय अध्यक्ष भीमा बागुल, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, राज्य सचिव दीपक गायकवाड, राज्य सचिव राजू कापसे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, भाऊसाहेब पगारे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैमुले, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शेवगाव तालुकाध्यक्ष सतिष मगर, राहाता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळजे, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे, पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, कोपरगाव तालुकाध्यक्ष सुनील ननवरे यांच्यासह भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, रवींद्र म्हसे, अंकुश भैमुले, भैय्या शेळके, किरण दाभाडे, श्री वैरागर, विनीत धसाळ, विजय खरात, अजय साळवे, सुभाष त्रिभुवन, कैलास कासार, राजू उबाळे, सुनील चांदणे, अॅड. कुमार भिंगारे, अनिल पलघडमल, सलीम शेख, राजू गायकवाड, निसार पठाण, मनोज काळे, सीमा बोरुडे, गोविंद दिवे, शशी पलघडमल, रमेश अमोलिक, रमा धिवर, करण कोळगे, आयुब पठाण, सिद्धार्थ सगळगिळे, राजन ब्राम्हणे, मोहन आव्हाड, रमेश शिरकांडे, मेजर विनोद ननवरे, आबा रणवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, कणगर ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव घाडगे तसेच कणगर ग्रामस्थ आणि आरपीआय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत