नेवासा(वेबटीम) नेवासा तालुक्यातील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था यांच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पसायदान’ पुरस्कार यंदा ...
नेवासा(वेबटीम)
नेवासा तालुक्यातील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था यांच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पसायदान’ पुरस्कार यंदा राहुरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय पंढरीनाथ महाराज वारकरी संस्था चे पंढरीनाथ महाराज तांदळे तसेच आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्य करणारे डॉ. संजय सोनवणे यांनाही ‘पसायदान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू करण्यात आलेला ‘पत्रकार रत्न पुरस्कार’ यंदा दैनिक अॅग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव संजय गर्जे व गोविंद महाराज निमसे यांनी दिली.
संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार, १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यानमंदिर प्रांगणात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नेवासा येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक तसेच शनैश्वर देवस्थान ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत