देवळाली प्रवरा(वेबटीम) मानव अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा येथी...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
मानव अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा येथील श्री साई मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
मानव अधिकार संरक्षण समितीच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लिंबाजी इंगवले, दत्तात्रय गडाख, भिकचंद वरघुडे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. गजानन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत