देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक प्रभाकर पंडित यांचे मंगळवारी (द...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक प्रभाकर पंडित यांचे मंगळवारी (दि. २ जून) वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभाकर पंडित यांनी आपल्या प्रदीर्घ शिक्षक सेवेत हजारो विद्यार्थ्यांना घडविले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वाने आणि विद्यार्थीकेंद्री कार्यपद्धतीने अनेक पिढ्यांवर सकारात्मक संस्कार केले.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांचे संस्कार, मार्गदर्शन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
त्यांच्यावर बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ९ वाजता सेंट मेरी कॅथोलिक चर्च, देवळाली प्रवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत