राहुरी फॅक्टरी येथील भुयारी गटारामुळे व्यावसायिक अडचणीत; शिवसेनेचे सुनील कराळे यांचा आंदोलनाचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील भुयारी गटारामुळे व्यावसायिक अडचणीत; शिवसेनेचे सुनील कराळे यांचा आंदोलनाचा इशारा

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या कडेला बांधण्यात आलेले भुयारी गटार स्थानिक व्यवसायिकांसाठी मोठा अड...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या कडेला बांधण्यात आलेले भुयारी गटार स्थानिक व्यवसायिकांसाठी मोठा अडसर ठरत असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल कराळे यांनी केला आहे. हे गटार तात्काळ जमिनदोस्त करण्यात यावे, अन्यथा नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कराळे म्हणाले की, नगर मनमाड महामार्गाचे सध्या काम सुरू आहे. या कामाच्या पूर्वतयारीदरम्यान रस्त्याच्या कडेला पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी भूयारी गटार उभारण्यात आले आहे. मात्र या गटाराची उंची रस्त्यापेक्षा अर्धा ते एक फूट जास्त असल्याने रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये ग्राहकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय मंदावला असून अनेक दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन संबंधित गटार हटवावे, अशी मागणी व्यवसायिकांकडून होत आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढला नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत