साई आदर्शच्या हॉलमध्ये उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई आदर्शच्या हॉलमध्ये उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:–   राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी पहाटे ५ ते ६.३०...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:– 

राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती योगप्रशिक्षक किशोर पा. थोरात यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती व साई आदर्श मल्टिस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे नऊ वर्षांपूर्वी भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेला स्थायी योग वर्ग आजतागायत अखंडपणे सुरू असून दररोज पहाटे ५ ते ६.३० या वेळेत साई आदर्श हॉलमध्ये नियमित योगसाधना केली जाते.

या स्थायी योग वर्गाच्या माध्यमातून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योगसाधना अत्यंत महत्त्वाची असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन योग वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत