अहिल्यानगर(वेबटीम) अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पतसंस्था व मल्टिस्टेट चळवळीच्यावतीन...
अहिल्यानगर(वेबटीम)
अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पतसंस्था व मल्टिस्टेट चळवळीच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे आणि साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
पतसंस्था आणि मल्टिस्टेट सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळकटी देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. बचत, कर्जपुरवठा, स्वयंरोजगार, लघुउद्योगांना आर्थिक सहाय्य तसेच आर्थिक समावेशनासाठी या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या चळवळीच्या बळकटीसाठी आणि सहकार क्षेत्रातील प्रश्न शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध राहू असे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत