कणगरचे सुनील गाढे अहिल्यानगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगरचे सुनील गाढे अहिल्यानगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर कार्यरत असलेले दत्तात्रय कवितके यांची नुकतीच अतिरिक्त जिल्हा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर कार्यरत असलेले दत्तात्रय कवितके यांची नुकतीच अतिरिक्त जिल्हाधिकारी पालघर या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर राहुरी तालुक्यातील कणगरचे सुनील गाढे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केलेली आहे.


गाढे यांनी यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून वर्धा गडचिरोली, तर प्रांताधिकारी म्हणून पुणे तसेच सातारा या जिल्ह्यात काम केले आहे. २००७ते २००९ या कालावधीत त्यांनी नेवासा तहसीलदार या पदावर काम केलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पाचोरा बारी या गावच्या पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तीच्या पुनर्वसनात तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी


यांच्यासमवेत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना २०१६ साली उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल विभागाने गौरव केलेला आहे तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळून बाधित झालेल्या ९ गावांचे तातडीने पुनर्वसन करण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीमुळे, तसेच भूकंपग्रस्त, कुणबी दाखल्याचे वाटप रात्री कार्यालयात उशिरापर्यंत थांबून काम केले असल्याने २०२२ मध्ये त्यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे.


त्यांची नियुक्ती अहिल्यानगर जिल्ह्यात झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातील विविध गावांमधून तसेच कनगर गावच्या पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. सामान्य कुटुंबातून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत सुनील गाढे यांनी मारलेली मजल निश्चीतच प्रेरणादायी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत