विश्वकर्मा वंशीय समाज संस्था राहुरी तालुकाध्यक्षपदी स्वप्निल राऊत यांची नियुक्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विश्वकर्मा वंशीय समाज संस्था राहुरी तालुकाध्यक्षपदी स्वप्निल राऊत यांची नियुक्ती

राहुरी/वेबटीम:- विश्वकर्मा वंशीय समाज संस्था (संघटन) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वप्निल राऊत यांची राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्...

राहुरी/वेबटीम:-




विश्वकर्मा वंशीय समाज संस्था (संघटन) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वप्निल राऊत यांची राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समाजाप्रती असलेली निष्ठा, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि संघटनेच्या कार्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र २८ जून २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.


पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या हस्ते स्वप्निल राऊत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक नागोजीराव पांचाळ, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सचिन सुतार तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


नियुक्तीनंतर स्वप्निल राऊत यांनी संघटनेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत राहुरी तालुक्यात समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली.


या नियुक्तीबद्दल समाजबांधवांकडून स्वप्निल राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


कार्यक्रमास शिवाजी शिरसाट, दीपक राऊत, आशुतोष मिस्तरी, अशोक वाघचौरे, राम गोरे, वनदेव शामराव पवार, महेश भालेराव यांच्यासह राहुरी शहरातील अनेक समाज प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वप्निल राऊत यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत