वांबोरीत शिक्षणाला बळ; ससे कुटुंबियांनी शाळेसाठी दिली जागा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरीत शिक्षणाला बळ; ससे कुटुंबियांनी शाळेसाठी दिली जागा

वांबोरी(सचिन गडाख) गावातील शिक्षणाची परंपरा अबाधित राहावी आणि एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने वांबोरी येथील सस...

वांबोरी(सचिन गडाख)



गावातील शिक्षणाची परंपरा अबाधित राहावी आणि एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने वांबोरी येथील ससे-गांधले वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी श्री. दत्तात्रय ससे व श्री. मंगेश दत्तात्रय ससे यांनी ५ गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


ससे-गांधले वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा भविष्यात अडचणीत येऊ नये, गावातील मुलांना शिक्षणासाठी दुसरीकडे जावे लागू नये आणि आपल्या वस्तीवरील शाळा कायम सुरू राहावी, या सामाजिक जाणीवेतून त्यांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यासाठी जमीन ही सर्वात मौल्यवान संपत्ती असते. अशा जमिनीतून शाळेसाठी जागा देणे म्हणजे पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले मोठे योगदान मानले जात आहे.


या निर्णयामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला भक्कम आधार मिळणार असून, ग्रामस्थांकडून ससे कुटुंबियांच्या या समाजहिताच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


याबद्दल वांबोरी शेतकरी संघटनेतर्फे श्री. दत्तात्रय ससे व श्री. मंगेश दत्तात्रय ससे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या या निर्णयाचा आदर्श इतरांनीही घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत